Monday, July 26, 2010

गुरुमाता द्यानदान योजना, औरंगाबाद

गुरुपौर्णिमा निमित्त मातोश्री भागाबाई हनुमंतराव चाटे प्रतिष्ठानची गुरुमाता द्यानदान योजना  प्रा. मछिन्द्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे यांनी जाहीर केली. अधिक माहितीसाठी कृपया गुरुमाता द्यानदान योजना या लिंकवर क्लिक करा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : २५ जुलै २०१०)

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. अर्ज दखल करण्याची अंतिम तारीख २१/०८/२०१० आहे. अर्जदाराच्या पालकाचे उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असावे, तसेच अर्जदाराला पदवी परीक्षेत ५०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
या बाबत अधिक माहितीसाठी कृपया ९९२२५०१६४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : २५ जुलै २०१०)

पिको व फ़ॉल यंत्रासाठी योजना

जिल्हा परिषदेच्या १०% सेसमधून ग्रामीण भागातील आर्थिक दृष्टया कमकुवत महिलांना यंदाही पिको व फ़ॉल यंत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी ग्रामीण भागातील दरिद्री रेषेखालील कुटुम्बाच्या यादीत समाविष्ट असलेल्या व वार्षिक उत्पन्न २० हजारांपर्यंत असलेल्या महिलांनी आपल्या जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधावा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : १९ जुलाई २०१०)

वैद्यकीय व अभियांत्रिकी साठी मिळणार बिनव्याजी कर्ज

वैद्यकीय व अभियांत्रिकी साठी मिळणार बिनव्याजी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. महाराष्ट्रात चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून राज्य शासनाने तसा आदेश काढला  आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण  मंत्री राजेश टोपे यांनी दिली. संपूर्ण माहिती करीता बिनव्याजी कर्ज ह्या लिंकवर क्लिक करा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : १९ जुलाई २०१०.)