Wednesday, March 17, 2010

आघारकर संशोधन संस्थेची महिलांसाठी शिष्यवृत्ती - ३१ मार्च २०१०

आवश्यक पात्रता : महिला उमेदवारांनी सायंस वा टेक्नोलोजी विषयातील पीएच. डी. केलेली असावी. त्यांनी टेक्नोलोजी, अभियांत्रिकी, सायंस, आरेखन, मेडीकल, फार्मसी यासारख्या  विषयातील  पदवी  चांगल्या मार्कान्नी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार महिलांनी संशोधन-प्रकल्प कालावधीत संशोधनपर पीएच. डी. साठी नोंदणी केलेली नसावी.  संबंधित क्षेत्रातील पूर्वानुभव असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. मात्र गेली सलग ३ वर्षे त्यांनी कुठल्याही प्रकारचे कम केलेले नसावे. याशिवाय अर्जदाराना या योजनेच्या कालावधीत इतर कुठल्याही प्रकारची शिष्यवृती मिळालेली नसावी.
वयोमर्यादा : वय ५० वर्षांहून अधिक नसावे.
शिष्यवृतीचा कालावधी व रक्कम : संशोधन प्रकल्पासाठी २ वर्षे कालावधीसाठी शिष्यवृती देण्यात येईल. शिष्यवृतीचा हा कालावधी आणखी १ वर्षासाठी वाढविता येईल. पदव्युत्तर पत्रताधारक असल्यास दरमाहा १०,००० रुपये व पीएच. डी. पत्रताधारक असल्यास दरमाहा १५,००० रुपये शिष्यवृती देण्यात येईल. याशिवाय संशोधकांना त्यांचा सशोधन प्रकाल्पाशी निगडीत उपकरणे, प्रवास व इतर खर्चासाठी पण आर्थिक मदत देण्यात येईल.
अर्जाचा नमूना व तपशील : अर्जाचा नमूना व तपशीलासाठी www.dstwosbari.org या संकेत  स्थळाला भेट द्यावी किंवा ०२० - २५६५३६८० (विस्तार - ३२) ह्या नंबर वर संपर्क करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता : विहित नमुन्यात भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि संशोधन प्रकल्पाच्या फोटो कॉपीच्या २ प्रती असणारे अर्ज ३१ मार्च २०१० पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत.
Dr. Shobha Rao
Co-Ordinator, Women Scientists Fellowship Scheme - 2010,
Aaghakar Research Institute, G. G. Aagarkar Road,
Pune - 411 004

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १० मार्च 2010)

Saturday, March 13, 2010

पूनावाला फावुंडेशनतर्फे अभियांत्रिकीसाठी शिष्यवृत्ती

पूनावाला फावुंडेशनतर्फे  विद्यार्थिनींना अभियांत्रिकी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना  शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तिसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी खालील पत्त्यावर संपर्क करावा.
अक्षय सेंटर, ऑफिस क्र. ८, पहिला मजला,
थेरगाव, पुणे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करा.
http://www.lilapoonawallafoundation.com/

संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १२/३/२०१०