Wednesday, March 17, 2010

आघारकर संशोधन संस्थेची महिलांसाठी शिष्यवृत्ती - ३१ मार्च २०१०

आवश्यक पात्रता : महिला उमेदवारांनी सायंस वा टेक्नोलोजी विषयातील पीएच. डी. केलेली असावी. त्यांनी टेक्नोलोजी, अभियांत्रिकी, सायंस, आरेखन, मेडीकल, फार्मसी यासारख्या  विषयातील  पदवी  चांगल्या मार्कान्नी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार महिलांनी संशोधन-प्रकल्प कालावधीत संशोधनपर पीएच. डी. साठी नोंदणी केलेली नसावी.  संबंधित क्षेत्रातील पूर्वानुभव असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. मात्र गेली सलग ३ वर्षे त्यांनी कुठल्याही प्रकारचे कम केलेले नसावे. याशिवाय अर्जदाराना या योजनेच्या कालावधीत इतर कुठल्याही प्रकारची शिष्यवृती मिळालेली नसावी.
वयोमर्यादा : वय ५० वर्षांहून अधिक नसावे.
शिष्यवृतीचा कालावधी व रक्कम : संशोधन प्रकल्पासाठी २ वर्षे कालावधीसाठी शिष्यवृती देण्यात येईल. शिष्यवृतीचा हा कालावधी आणखी १ वर्षासाठी वाढविता येईल. पदव्युत्तर पत्रताधारक असल्यास दरमाहा १०,००० रुपये व पीएच. डी. पत्रताधारक असल्यास दरमाहा १५,००० रुपये शिष्यवृती देण्यात येईल. याशिवाय संशोधकांना त्यांचा सशोधन प्रकाल्पाशी निगडीत उपकरणे, प्रवास व इतर खर्चासाठी पण आर्थिक मदत देण्यात येईल.
अर्जाचा नमूना व तपशील : अर्जाचा नमूना व तपशीलासाठी www.dstwosbari.org या संकेत  स्थळाला भेट द्यावी किंवा ०२० - २५६५३६८० (विस्तार - ३२) ह्या नंबर वर संपर्क करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता : विहित नमुन्यात भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि संशोधन प्रकल्पाच्या फोटो कॉपीच्या २ प्रती असणारे अर्ज ३१ मार्च २०१० पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत.
Dr. Shobha Rao
Co-Ordinator, Women Scientists Fellowship Scheme - 2010,
Aaghakar Research Institute, G. G. Aagarkar Road,
Pune - 411 004

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १० मार्च 2010)

No comments:

Post a Comment